Share Market Opening : व्यवहार सुरू होताच शेअर मार्केटने केला नवा रेकॉर्ड; सेन्सेक्स-निफ्टीने गाठला उच्चांक!

Sensex-Nifty Today : व्यवहारांच्या सुरुवातीला सेन्सेक्स 156.75 अंकांनी वर जाऊन 74,242 अंकांवर होता, तर निफ्टी 31.25 अंकांनी वर जाऊन 22,505.30 अंकांवर उघडला.
Share Market Opening
Share Market OpeningeSakal

Share Market Opens at Record High : गुरुवारी (7 मार्च) शेअर बाजार नव्या रेकॉर्डसह ओपन झाला. व्यवहारांच्या सुरुवातीला सेन्सेक्स 156.75 अंकांनी वर जाऊन 74,242 अंकांवर होता, तर निफ्टी 31.25 अंकांनी वर जाऊन 22,505.30 अंकांवर उघडला. सेन्सेक्स आणि निफ्टीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

सेन्सेक्स-निफ्टी

ओपनिंग ट्रेड्समध्ये रेकॉर्ड केल्यानंतर निफ्टी 2.25 अंकांनी खाली आलं. त्यानंतर निफ्टीमधील 50 पैकी 27 शेअर्स हे ग्रीन मार्कवर आहेत, तर 21 शेअर्स हे रेड मार्कवर आहेत. दोन शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय ट्रेड करत आहेत.

सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स तेजीत आहेत, तर 13 शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. सेन्सेक्समधील टाटा स्टील 3.63 टक्क्यांनी वर असून, तो सध्याचा टॉप गेनर आहे. त्यापाठोपाठ जेएसडब्ल्यू स्टील (3.21% अप), बजाज फिनसर्व्ह (2.19% अप) आणि बजाज फायनान्स (2.06% अप) आहेत. एसबीआयमध्ये देखील 0.89 टक्क्यांची वाढ दिसत आहे.

Share Market Opening
Indian GDP : ‘जीडीपी’ वाढीचा दर ६.८ टक्के ; भारत २०३१ पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न गटात

बीएसई मार्केट कॅप

बीएसईचं मार्केट कॅप सध्या 392.46 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. आज ट्रेड होणाऱ्या 2,992 शेअर्सपैकी 1,964 शेअर्स तेजीमध्ये दिसत आहेत. 941 शेअर्स कोसळले असून, 87 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 81 शेअर्सवर अपर सर्किट लागलं असून, 103 शेअर्सवर लोअर सर्किटचा प्रभाव दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com