
Sergey Brin Share Donation: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज सर्गेई ब्रिन यांनी अल्फाबेटचे जवळपास 41 लाख शेअर्स दान केले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, त्यांची किंमत 700 दशलक्ष डॉलर (सुमारे 6,000 कोटी रुपये) आहे. हे 'गिफ्ट' कोणाला मिळाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्गेई ब्रिन हे गुगलचे सह-संस्थापक आहेत.