Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Axis Bank: 22 Crore Loan Fraud! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Seven directors of firm booked for cheating Axis Bank of Rs 22-29 crore
Seven directors of firm booked for cheating Axis Bank of Rs 22-29 crore Sakal

Axis Bank: ॲक्सिस बँकेची 22.29 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका फायनान्स कंपनीच्या सात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, बेटर व्हॅल्यू लीजिंग अॅन्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी मार्च 2016 ते मार्च 2020 दरम्यान ॲक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. मुंबईतील कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे ॲक्सिस बँक कर्ज फसवणूक प्रकरण?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲक्सिस बँकेच्या 43 वर्षीय असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून त्यानुसार कंपनीचा ॲक्सिस बँकेशी 2005 पासून व्यवहार होता आणि कर्जही घेतले होते.

परंतु बेटर व्हॅल्यू लीजिंग अॅन्ड फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी मार्च 2016 ते मार्च 2020 या कालावधीत कट रचला आणि ॲक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. आणि कंपनीवर 22.29 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Seven directors of firm booked for cheating Axis Bank of Rs 22-29 crore
Akshay Tritiya 2024: सोन्याचा वार्षिक १६ टक्के परतावा; भाव कमी झाल्याने अक्षय्य तृतीयेला खरेदीची संधी

फिच रेटिंगने BB+ रेटिंग दिले

Axis बँकेला Fitch रेटिंग एजन्सीने 'BB+' रेटिंग दिले आहे. ॲक्सिस बँकेबाबत फिचने सांगितले की, बँकेची वाढ सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत ॲक्सिस बँकेचा निव्वळ नफा 7,130 कोटी रुपये होता, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला 5,762 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

मार्च 2024च्या तिमाहीत बँकेची नॉन-परफॉर्मिंग असेट (NPA) 1.43 टक्के होती, जी एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 2.02 टक्के आहे.

Seven directors of firm booked for cheating Axis Bank of Rs 22-29 crore
Akshaya Tritiya 2024: सोन्याच्या बाजारपेठेला झळाळी; अक्षय्य तृतीयेनिमित्त मोठी उलाढाल, सराफ व्यावसायिकांना विश्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com