
Top 10 Richest Actors: बॉलिवूड स्टार शाहरुख खान कमाईतसुद्धा 'किंग' आहे. कमाईच्या बाबतीत, त्याने केवळ भारतीय स्टार्सनाच नाही तर अनेक हॉलिवूड कलाकारांनाही मागे टाकले आहे. शाहरुखने ब्रॅड पिट, जॉर्ज क्लूनी आणि रॉबर्ट डी नीरो सारख्या हॉलिवूड दिग्गजांना मागे टाकत चौथे स्थान मिळवले आहे. शाहरुख केवळ चित्रपटांमधूनच नाही तर गुंतवणूक, जाहिराती आणि व्यवसायातूनही कमाई करतो.