Angel One Data Breach: ब्रोकिंग फर्म एंजेल वनच्या 8 दशलक्ष वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा झाला लीक; कंपनीनं दिल स्पष्टीकरण

Angel One data breach: Personal data of nearly 8 million Angel One customers leaked online: एंजेल वन कंपनीने दावा केला की क्लायंट सिक्युरिटीज, फंड आणि क्रेडेन्शियल्सवर कोणताही परिणाम झाला नाही आणि सर्व क्लायंट खाती सुरक्षित आहेत.
Angel One Data Breach
Angel One Data BreachSakal

Angel One Data Breach: मुंबईमध्ये असलेल्या स्टॉक ब्रोकिंग फर्म एंजेल वनच्या सुमारे 7.9 दशलक्ष ग्राहकांची वैयक्तिक माहिती (डेटा) लीक झाला आहे. हॅकरने दावा केला आहे की, वापरकर्त्यांची नावे आणि पत्त्यांसह वैयक्तिक माहिती लीक केली तसेच ग्राहकांच्या नफा आणि तोटा (Profit And Loss ) स्टेटमेंटसह संवेदनशील डेटा ऍक्सेस केला आहे.

आणि आतापर्यंत डेटाचा फक्त काही भाग जारी केला गेला आहे असेही सांगितले आहे. एका अहवालात सायबर सुरक्षा सल्लागाराचा हवाला देखील देण्यात आला आहे ज्याचा असा विश्वास आहे की हा डेटा 2023 चा आहे.

2023 मध्ये एप्रिलमध्ये एंजेल वनला डेटा भंगाचा सामना करावा लागला हाेता, मीडिया कंपनी Inc42 च्या वृत्तानुसार एंजेल वन फर्मने अज्ञात ग्राहकांच्या संख्येवर परिणाम करणारे डेटा उल्लंघन नोंदवले हाेते परंतु निधी आणि सिक्युरिटीज संबंधित माहिती सुरक्षित असल्याचे सांगितले. कंपनीने यावर स्पष्टीकरण देत म्हणाले हॅकरने प्रभावित वापरकर्त्यांची नावे, मोबाइल नंबर आणि ईमेल यामार्फत प्रवेश मिळवला होता.

स्टॉक ब्रोकिंगमधील सायबर सुरक्षा धोका

म्युच्युअल फंड आणि स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीसाठी सामान्य लोकांची वाढती अोढ यामुळे शेअर ब्रोकिंग उद्योगात लक्षणीय वाढ झाली आहे.

मार्च २०२४ पर्यंत, भारतात डिमॅट खात्यांची संख्या 151 दशलक्ष हाेती, जून २०२४ महिन्यात तब्बल ४२ लाखांहून अधिक नवी डी-मॅट खाती उघडण्यात आली आहेत. जी गुंतवणूकीत लक्षणीय वाढ दर्शवते.

शेअर मार्केटमध्ये शेअर्सचे व्यापार करण्यासाठी डिमॅट खाती अनिवार्य असते. भारतातील वाढत्या शेअर्सचे व्यापार आणि माेठ्या प्रमाणात वाढणारा डेटा यामुळे वित्तीय उद्योगातील सायबरसुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

Angel One Data Breach
Larsen & Toubro L&T India : लार्सन एंड टुब्रोला 15000 कोटीची मेगा ऑर्डर, शेअर्सवर चांगला परिणाम...

एंजेल वन कंपनीने दावा केला की क्लायंट सिक्युरिटीज, फंड आणि क्रेडेन्शियल्सवर कोणताही परिणाम झाला नाही आणि सर्व क्लायंट खाती सुरक्षित आहेत. डेटा लीकचा स्रोत ओळखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत आणि पुढील कोणतेही उल्लंघन टाळण्यासाठी पायाभूत सुविधा आणखी मजबूत करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com