Ajanta Pharma Buyback 2024 : अजंता फार्माच्या बायबॅक प्लानमुळे शेअर्समध्ये तेजी...

फार्मास्युटिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी अजंता फार्माच्या (Ajanta Pharma) शेअर्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
Ajanta Pharma Buyback 2024
Ajanta Pharma Buyback 2024 Sakal

Ajanta Pharma Buyback 2024 : फार्मास्युटिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी अजंता फार्माच्या (Ajanta Pharma) शेअर्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. मार्च 2024 तिमाहीचे भक्कम निकाल आणि बायबॅक प्लानमुळे त्याच्या शेअर्सना दुप्पट सपोर्ट मिळाला.

यामुळे शेअर्सनी सुमारे 14 टक्क्यांनी तेजी नोंदवली आणि एक वर्षाचा उच्चांक गाठला. प्रॉफिट बुकींगमुळे किंमत थोडी कमी झाली आहे पण ती अजूनही मजबूत स्थितीत आहे. सध्या हा शेअर 2,372 रुपयांवर ट्रेड करत आहे. पण शुक्रवारी दिवसभरात त्याने 2540 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

मार्च तिमाहीत अजंता फार्माचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 66 टक्क्यांनी वाढून 202.72 कोटीवर पोहोचला आहे. या कालावधीत महसुलात 20 टक्क्यांनी वाढ होऊन तो 1,054.08 कोटीवर पोहोचला आहे.

कंपनीच्या विविध व्यवसायांबद्दल बोलायचे झाल्यास, अमेरिकन जेनेरिक व्यवसाय वार्षिक आधारावर 32 टक्के आणि आशिया ब्रँडेड जेनेरिक 18 टक्क्यांनी वाढला. अमेरिकन जेनेरिकचा वाटा त्याच्या एकूण विक्रीपैकी 25 टक्के आहे आणि आशियाई ब्रँडेड जेनेरिकचा वाटा 18 टक्के आहे.

आफ्रिकन ब्रँडेड जेनेरिक आणि संस्थात्मक विक्रीचा एकूण महसुलात 17 टक्के वाटा आहे आणि मार्च तिमाहीत वार्षिक 17 टक्के वाढ झाली आहे. देशांतर्गत फॉर्म्युलेशन विभागाचा एकूण महसुलात 31 टक्के वाटा आहे आणि वर्षभरात 14 टक्के वाढ झाली आहे.

याशिवाय कच्च्या मालाच्या किमतीत घट, कर्मचाऱ्यांवर कमी खर्च आणि इतर खर्चात घट यामुळे कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये सुधारणा झाली. त्याचे EBIDA मार्जिन 26.4 टक्क्यांवरून 10 टक्क्यांनी घसरून 16.9 टक्क्यांवर आले.

कंपनीच्या बोर्डाने मार्च तिमाहीच्या निकालांसह चौथ्या बायबॅक प्लानला मंजुरी दिली. बायबॅकद्वारे, कंपनी 10.28 लाख इक्विटी शेअर्स खरेदी करेल जे कंपनीच्या 0.82 टक्के शेअर्सच्या बरोबरीचे आहे. या बायबॅकची किंमत 2770 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनी शेअर बायबॅकवर 285 कोटी खर्च करणार आहे.

विक्री आणि नवीन लॉन्चच्या विस्ताराच्या आधारावर त्यांच्या ब्रँडेड व्यवसायाची वाढ आर्थिक वर्ष 2025 मध्ये मजबूत होऊ शकते असा विश्वास नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजला वाटत आहे . जागतिक विस्तारामुळे आणि इनपुट खर्चात घट झाल्यामुळे,

तिचे EBITDA मार्जिन आणखी 1 टक्क्यांनी सुधारू शकते असे ब्रोकरेज फर्म नुवामाला वाटत आहे. त्यामुळेच ब्रोकरेजने अजंता फार्माला बाय रेटिंग दिले आहे आणि 2560 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com