
कौस्तुभ केळकर- आर्थिक विषयांचे अभ्यासक
चांदीचा प्रतिकिलो भाव २० जून रोजी सुमारे एक लाख सहा हजार रुपयांच्या (मल्टीकमोडिटी एक्स्चेंजवरील भाव) उच्चांकी पातळीजवळ होता. ही भाववाढ सोन्यातील भाववाढीला अनुसरून आहे. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये चांदीच्या भावात सुमारे २१ टक्के, तर सोन्याच्या भावात सुमारे २८ टक्के वाढ झाली. ही वाढ बघून अनेक गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला, साहजिकच त्यांना शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, २०२५ च्या अखेरपर्यंत ही भाववाढ सुरू राहण्याची अपेक्षा आहे.