
Shivaji Maharaj Tax System
Sakal
शिवाजी महाराजांच्या काळात कोकणातील महसूल व्यवस्था शिस्तबद्ध व लोकाभिमुख होती.
कर निर्धारण पिकांचे प्रकार, जमिन व नुकसानीच्या आधारावर ठरवले जात असे.
अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली महसूल गोळा केला जाई.
Shivaji Maharaj Tax System: शिवाजी महाराजांच्या काळात कोकण प्रांतातील महसूल व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख होती. प्रांताचे प्रशासन करण्यासाठी सुभेदार, मामलेदार आणि फडणीस यांची नेमणूक केली जात असे. या अधिकाऱ्यांना महसुलाची चौकशी, कर ठरविणे, सूट देणे आणि स्थानिक गरजेनुसार बदल करण्याचे अधिकार होते.