Signoria Creations IPO : सिग्नोरिया क्रिएशनचा आयपीओ आजपासून खुला, तुम्ही गुंतवणार का पैसे ?

सिग्नोरिया क्रिएशन्सचा (Signoria Creation) आयपीओ आजपासून सुरु झाला आहे. 12 मार्च ते 14 मार्चपर्यंत या आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
Signoria Creations IPO open from today will you invest
Signoria Creations IPO open from today will you invest Sakal
Updated on

Signoria Creations IPO : सिग्नोरिया क्रिएशन्सचा (Signoria Creation) आयपीओ आजपासून सुरु झाला आहे. 12 मार्च ते 14 मार्चपर्यंत या आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे. कंपनीने या आयपीओमधून 9.28 कोटी उभारण्याची योजना आखली आहे. आयपीओसाठीचा प्राइस बँड हा 61-65 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.

बोलीसाठी किमान लॉट साइज 2000 शेअर्स निश्चित करण्यात आली आहे. आयपीओमध्ये 14.28 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. आयपीओ बंद झाल्यानंतर, कंपनीच्या शेअर्सची लिस्टींग एनएसई एसएमईवर 19 मार्चला होईल.

सिग्नोरिया क्रिएशनचा आयपीओ लॉन्च होण्याआधी ग्रे मार्केटमध्ये 65 ते 50 रुपयांवर अर्थात 76.92 टक्के अप्पर प्राइस बँडमध्ये ट्रेडिंग करत होता. ग्रे मार्केट एक अनधिकृत बाजार आहे जिथे आयपीओचे शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट होईपर्यंत ट्रेड करतात.

सिग्नोरिया क्रिएशनच्या आयपीओसाठी होलानी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत आणि मार्केट मेकर होलानी कन्सल्टंट्स आहेत. वासुदेव अग्रवाल,

बबिता अग्रवाल, मोहित अग्रवाल आणि कृतिका छछंद हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. आयपीओमधील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

सिग्नोरिया क्रिएशन या कंपनीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. सिग्नोरिया क्रिएशन लिमिटेडच्या प्रॉडक्ट्समध्ये महिलांसाठी कुर्ती, पँट, कुर्ती-पँट आणि दुपट्टा सेट, टॉप्स, को-ऑर्ड सेट, गाऊन यांचा समावेश आहे. त्याच्या दोन मॅन्युफॅक्चरिंग युनिटपैकी एक मानसरोवर, जयपूर येथे आहे आणि दुसरे सांगानेर येथे आहे.

एप्रिल ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कंपनीचा महसूल 6.52 कोटी रुपये होता. या कालावधीत 64.52 लाख रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला गेला. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, सिग्नोरिया क्रिएशनचा महसूल 62.13 टक्क्यांनी वाढून 19.15 कोटी रुपये होईल आणि निव्वळ नफा 242.14 टक्के होईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com