

Gold-Silver Price Today
Sakal
Gold-Silver Price Today: जागतिक व्यापारातील तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे चांदीचे भाव वाढत आहेत. देशांतर्गत बाजारात मात्र चांदीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत तब्बल ₹1,000 ने वाढून ₹1.40 लाख प्रति किलो या नव्या उच्चांकावर पोहोचली. बुधवारी ती ₹1,39,000 प्रति किलोवर होती.
अखिल भारतीय सराफा संघटनेच्या (AISC) मते, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या मागणीचा आणि भाववाढीचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे.