
थोडक्यात:
आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात 792 रुपयांची वाढ, चांदीने नवा उच्चांक गाठला.
24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 98,303 रुपयांवर पोहोचलं; चांदी प्रति किलो 1,13,867 रुपयांवर.
अमेरिका-डॉलर टॅरिफ तणाव, कमकुवत रुपया आणि सुरक्षित गुंतवणूक पर्यायामुळे सोन्याच्या मागणीत वाढ.
Gold-Silver Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 792 रुपयांची वाढ झाली असून चांदीनं पुन्हा एकदा ऑल-टाईम हाय गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) सोमवारी सायंकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार सोनं आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.