
Silver Investment Opportunity: काही महिन्यांपूर्वी, आपण चर्चा करत होतो की 1 लाख रुपयांचा टप्पा कोण गाठेल - बीएसई सेन्सेक्स की सोने? 22 एप्रिल रोजी सोन्याच्या भावाने या चर्चेला पूर्णविराम दिला. कारण त्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या पुढे गेला.
पण सोन्यासोबतच चांदीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अलिकडच्या काळात सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांदीचा समावेश करण्याची वेळ आली आहे का? जाणून घेऊया.