
Silver Investment Options: चांदीची चमक वाढत आहे. चांदीचे भाव रोज नवा विक्रम करत आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या दिवाळीपर्यंत चांदीची किंमत प्रति किलो 1.30 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. केडिया अॅडव्हायझरीजचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या मते, दिवाळीपर्यंत चांदीच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.
चांदीची किंमत 1 लाख 25 हजार रुपयांवरून 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. त्यांनी यामागील सर्वात मोठे कारण जागतिक बाजारपेठेतील तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले आहे.