
Silver Rate Today: ज्याप्रमाणे लोक सोन्याची खरेदी करत आहेत, त्याचप्रमाणे चांदीच्या मागणीतही वाढ होताना दिसत आहे. चांदीची तेजी कायम राहिल्यास, COMEXवर चांदी $40 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. तर, पुढील तीन ते चार महिन्यांत एमसीएक्सवर चांदीच्या किमती 1,25,000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढू शकतात. व्याजदर कपातीची अपेक्षा, चीनच्या मागणीत सुधारणा यामुळे भावात वाढ होऊ शकते. ज्यामुळे नजीकच्या भविष्यात चांदी सोन्याला मागे टाकू शकते.