Gold Rate Today
Sakal
Gold rate in India : सोन्याच्या भावात सातत्याने वाढ-घट होत असते. देशभरात सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सोन्याला मोठी मागणी आहे. यातच आज सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज १७ डिसेंबरला २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३४,६६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.
कालच्या घसरणीनंतर आज २४ कॅरेट सोन्याच्या भावात ६५० रुपये प्रति तोळा एवढी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६०० रुपयांनी वाढून १,२३,४५० इतका झाला आहे.