
कोरोना महासाथीचे संकट कमी झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या भावात होत असलेली वाढ अद्याप कायम आहे. चांदीचा प्रतिकिलो भाव एक लाख रुपयांच्या पुढे गेला असून, सोने प्रतिदहा ग्रॅम ९१ हजार रुपयांच्या घरात पोचले आहे. चांदीनंतर आता सोनेदेखील एक लाखाचा टप्पा पार करण्याच्या गतीने वाढत आहे. ही भाववाढ होण्यामागे कोणती कारणे आहेत. गेल्या पाच वर्षांत सोने आणि चांदीचा भाव कसा वाढत गेला? आणि यापुढे नेमकी काय परिस्थिती असू शकते? हे मांडणारी ही वृत्तमालिका.