
Mutual Fund SIP: शेअर बाजारातील घसरणीमुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मध्यमवर्गीयांच्या पसंतीस उतरलेल्या म्युच्युअल फंड एसआयपीबाबतही लोकांचा भ्रमनिरास होत आहे. एसआयपी खाती बंद करण्याचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड डिसेंबर महिन्यात मोडले आहेत. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार डिसेंबर महिन्यात 45 लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत.