
SIP Top 5 Mistakes
Sakal
SIP ही शिस्तबद्ध गुंतवणुकीची सोपी पद्धत असून छोट्या रकमेतून मोठं भांडवल उभारता येतं.
पण बाजार घसरल्यावर SIP थांबवणे, रिसर्च न करता फंड निवडणे या चुका परतावा कमी करू शकतात.
SIPमधून खरं यश मिळवायचं असेल तर स्पष्ट उद्दिष्टं ठरवून, सातत्य आणि संयम ठेवून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
SIP Top 5 Mistakes: आजच्या काळात गुंतवणुकीसाठी सर्वात सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग कोणता, असा प्रश्न विचारला तर बहुतेकांचं पहिलं उत्तर असेल, SIP. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम गुंतवून मोठा फंड तयार करता येतो. पण या साध्या आणि सुरक्षित वाटणाऱ्या पद्धतीतसुद्धा काही चुका गुंतवणूकदारांकडून वारंवार होतात. या चुका टाळल्या नाहीत तर परतावा मिळण्याऐवजी चांगलाच फटका बसू शकतो. पाहूया अशा पाच महत्त्वाच्या चुका कोणत्या आहेत.