IGBC Certificate : ‘स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन’ला ‘आयजीबीसी’चे प्रमाणपत्र

स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रा. लि.ला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचे (आयजीबीसी) प्‍लॅटिनम प्रमाणपत्र मिळाले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्‍यासाठी कंपनीने राबविलेल्या सातत्‍यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी हा सन्मान देण्यात आला असून, तो मिळविणारी ती देशातील पहिली वाहन उत्पादक कंपनी आहे.
IGBC Certificate
IGBC Certificatesakal

पुणे : स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रा. लि.ला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचे (आयजीबीसी) प्‍लॅटिनम प्रमाणपत्र मिळाले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्‍यासाठी कंपनीने राबविलेल्या सातत्‍यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी हा सन्मान देण्यात आला असून, तो मिळविणारी ती देशातील पहिली वाहन उत्पादक कंपनी आहे.

कंपनीचा चाकण येथे प्रकल्प आहे. येथे सौर ऊर्जा निर्मिती, ऊर्जा-कार्यक्षम विद्युतयंत्रणा, उपकरणे, वाहतूकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, जल संवर्धन, प्रभावी कचरा व्‍यवस्‍थापन आणि कर्मचाऱ्यांना पर्यावरणसंवर्धनासाठी चालना असे विविध उपक्रम राबविले जातात. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल सर्टिफिकेशन मिळण्‍यासाठी कंपन्‍यांना त्‍यांच्‍या एकूण क्षेत्रांपैकी किमान १५ टक्‍के क्षेत्र हरितक्षेत्रासाठी वापरावे लागते. कंपनीने व्‍हर्टिकल गार्डन उभारत हे ध्‍येय साध्‍य केले आहे.

IGBC Certificate
Indian GDP : ‘जीडीपी’ वाढीचा दर ६.८ टक्के ; भारत २०३१ पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न गटात

‘‘पुण्‍यातील केंद्रासाठी मानाचे आयजीबीसी प्‍लॅटिनम प्रमाणपत्र मिळाल्‍याचा आम्हाला आनंद होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रात १०० टक्‍के हरित ऊर्जेचा वापर केला जातो, तर पुण्‍यात एकूण वापरापैकी जवळपास ३० टक्‍के हरित ऊर्जेचा वापर केला जातो. हरित उपक्रमांसह आम्‍ही शाश्‍वतता-केंद्रित वाहन उत्पादक कंपनी म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ करू, असे मत कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पीयूष अरोरा म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com