
Mutual Fund
Sakal
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप या पर्यायांबद्दल अनेक गुंतवणूकदार गोंधळतात.
गेल्या 10 वर्षांच्या आकडेवारीनुसार स्मॉल-कॅप फंडांनी सर्वाधिक परतावा दिला, मात्र जोखीमही जास्त आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने लार्ज-कॅप स्थिर मानले जातात, तर मिड-कॅप संतुलित पर्याय आहे.
Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की नेमकं कोणत्या प्रकारच्या फंडात पैसे गुंतवावेत. फक्त गुंतवणूक करणे पुरेसे नसून, पैसे कोणत्या फंडात टाकले आहेत हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. विशेषतः स्मॉल-कॅप, मिड-कॅप आणि लार्ज-कॅप या तिन्ही प्रकारच्या फंडांपैकी कोणता फंड दीर्घकाळात अधिक चांगला परतावा देऊ शकतो, याबाबत गुंतवणूकदारांना उत्सुकता असते.