
महिलांसाठी म्युच्युअल फंड हा लवचिक आणि सोपा गुंतवणुकीचा पर्याय आहे.
SIP द्वारे छोट्या रकमेपासून सुरुवात करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता येते.
उद्दिष्टाधारित गुंतवणूक आणि नियमित रिव्ह्यूमुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते.
Women and Mutual Funds: आजच्या काळात आर्थिक साक्षरता वाढल्यामुळे महिला स्वतःच्या बचतीकडे आणि गुंतवणुकीकडे गंभीरतेने पाहू लागल्या आहेत. कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण, करिअर ब्रेक अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची आहे. यासाठी म्युच्युअल फंड हा महिलांसाठी सर्वात सोपा, लवचिक आणि विश्वासार्ह पर्याय बनला आहे.