वाहनउद्योगाचे देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) सुमारे सात टक्के योगदान आहे, तर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात सुमारे १४ टक्के योगदान आहे. या उद्योगाने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सुमारे २० लाख कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नावीन्यपूर्ण संशोधन आणि तांत्रिक प्रगतीच्या माध्यमातून भारतीय वाहनउद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान; तसेच मागणी यामुळे वाहनक्षेत्र गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट संधी निर्माण करत आहे. मध्यम क्षमतेच्या मोटरसायकलची मागणीही प्रचंड वाढत असून, ग्राहक प्रामुख्याने प्रीमियम मोटरसायकलची निवड करत आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वाहनउद्योगाला व्यवसायवृद्धीची मोठी संधी आणि क्षमता आहे.