
Sovereign Gold Bond: सर्वसामान्यांसाठी आता सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. सोन्याच्या रोजच्या वाढत्या किमतीने लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, सरकार असा निर्णय घेणार असून त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. शनिवारी अर्थसंकल्पानंतर माध्यमांनी जेव्हा अर्थमंत्र्यांना एसजीबी योजनेवर प्रश्न विचारला तेव्हा अर्थमंत्र्यांकडून उत्तर आले की, सरकार ही योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे.