Starbucks New RuleSakal
Personal Finance
Starbucks New Rule: स्टारबक्सच्या नव्या नियमाची सोशल मीडियावर होतेय चर्चा; काय आहे नियम?
Starbucks New Code of Conduct: जर तुम्ही स्टारबक्समध्ये प्रवेश केला तर तुम्हाला काही करी खरेदी करावेच लागेल. हा नवा नियम 27 जानेवारीपासून लागू होणार आहे. या नव्या नियमाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Starbucks New Code of Conduct: अमेरिकन कॉफी ब्रँड स्टारबक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कंपनीने एक नवीन नियम केला आहे. या नियमाअंतर्गत तुम्हाला फ्री वाय-फाय वापरायचे असेल किंवा वॉशरूम वापरायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला कॅफेमधून काही तरी खरेदी करावे लागेल. तरच या सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत.
याचा अर्थ, जर तुम्ही स्टारबक्समध्ये प्रवेश केला तर तुम्हाला काहीतरी खरेदी करावेच लागेल. हा नवा नियम 27 जानेवारीपासून लागू होणार आहे. या नव्या नियमाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

