गुंतवणूक न करता Business करायचाय? होय हे शक्य आहे!

कोणतीही गुंतवणूक न करता किंवा अगदी कमी गुंतवणूक करून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकता. असे कोणते व्यवसाय आहेत ज्यात गुंतवणूकीची गरज नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
झिरो इन्व्हेस्टमेंट बिझिनेस
झिरो इन्व्हेस्टमेंट बिझिनेसEsakal

अलिकडे प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी धडपड करत आहेत. यातही अधिकचा पैसा कमवायचा म्हणजे बिझनेस करायला हवा असं अनेकांना वाटतं. बिझनेस Business म्हणजेच व्यवसायाच अधिक नफा आणि पैसा आहे असं प्रत्येकाला वाटतं. मात्र बिझनेस करायचा म्हंटलं तर तो कोणता करावा असा पहिला प्रश्न अनेकांना पडतो तर त्याहून महत्वाची समस्या असते ती म्हणजे बिझनेस करण्यासाठी आधी गुंतवणूक Investment करायला पैसा हवा आणि मग गाडी इथेच थांबते. Start your own business without investing money or taking loan

कधी बँक लोन Bank Loan देण्यास तयार होत नाही तर कधी कागदपत्र पुरेश नसल्याने लोन मिळत नाही. अनेकजण कर्ज घेऊन व्यवसाय केला आणि तो डुबला तर काय? या चिंतेने लोन घेण्याची जोखिम टाळतात. मग पैसा नाही तर व्यवसाय कसा करावा? तर हे शक्य आहे. कोणतीही गुंतवणूक न करता किंवा अगदी कमी गुंतवणूक करून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकता. असे कोणते व्यवसाय आहेत ज्यात गुंतवणूकीची गरज नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेकांना स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असते. यात पूर्णवेळ कमाईचं साधन म्हणून काहींना बिझनेस करायचा असतो. तसचं कॉलेज विद्यार्थी, गृहिणी, नोकरीतून निवृत झालेले एवढचं काय तर अनेक नोकरी करणाऱ्यांना ही अलिकेडे साईड इनकम म्हणून एखादा व्यवसाय करायचा असतो. तोही गुंतवणू न करता किंवा जवळपास असलेल्या थोड्या थोडक्या रकमेत. पैशाविना व्यवसाय करणं शक्य आहे. यासाठी तुम्हाला तुमच्यात असलेल्या स्किल्सचा म्हणजेच कौशल्याचा वापर करायचा आहे. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तुम्ही व्यवसायात यश नक्कीच मिळवू शकता. तर असे कोणते बिझनेस आहेत ज्यात गुंतवूणीची गरज भासत नाही.

यामध्ये दोन प्रकारचे व्यवसाय येता एक म्हणजे ऑनलाईन आणि दुसरे ऑफलाईन. सध्याच्या डिजिटल युगात व्यवसायाचे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातील अनेक बिझनेस तुम्ही घरबसल्या करू शकता.

हे देखिल वाचा-

झिरो इन्व्हेस्टमेंट बिझिनेस
काय सांगता! कुत्र्यांसाठी आईस्क्रीम बनवली, उर्मिला कोठारेचा बिझनेस थेट Shark Tank India 2 मध्ये?

ऑनलाईन बिझनेस

ब्लाॅगिंग- केवळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आणि इंटरनेट असणं गरजेच आहे. तुम्ही कोणत्याही विषयावरील किंवा तुम्हाला जाण असलेल्या विषयावरील लेख लिहू शकता आणि विविध ब्लाॅगिंग साईटस्वर अपलोड करू शकता. यासाठी तुम्हाला पैसै खर्च करण्याची गरज नाही. सुरुवातीला कदाचित वाचकांची संख्या कमी असू शकते. मात्र जस जसे तुमचे लेख वाढती तशी वाचकांची संख्याही वाढेल. वाचकांची संख्या वाढल्यानंतर बरेच ब्रँड तुमच्या पेजवर जाहिराती देण्यास तयार होतात. या जाहिरातींच्या माध्यमातून चांगली कमाई होवू शकते. लक्षात घ्या यासाठी गुंतवणूक ही तुमची वेळ, तुमचा थोडाफार आभ्यास आणि लेखन कौशल्य आहे. वेळेनुसार तुम्ही अपडेट राहिलात आणि वाचकांची रुची पाहून लिखाण केलं तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. यात तुम्ही मनोरंजन, पाककला, राजकारण, वर्तमान घडामोडी, खेळ, आरोग्य किंवा तुम्ही एखाद्या विषयात पारंगत असाल, तर त्या विषयी माहिती देणारे लेख लिहू शकता.

Youtube Video (व्लॉग)- अलिकडे युट्यूब तसचं इन्स्टाग्रामचा वापर करोडो लोक करत आहेत. यातच व्लॉग म्हणजे व्हिडिओ कंटेट क्रिएटिंगचं महत्व वाढत चाललं आहे. युट्यूबर बनून म्हणजे युट्यूबवर स्वत:च चॅनल सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. यासाठी कोणतीही गुंतवणूक गरजेची नाही. तुम्ही केवळ तुमचा मोबाईल आणि इंटरनेट असेल तरी हे काम तुमच्या सोयीच्या वेळेनुसार सहज करू शकता. यात तुम्हाला तुमची क्रिएटीव्हिटी गुंतवणूक म्हणून वापरायची आहे. इथेही तुम्ही मनोरंजन, फॅशन, मेकअप, पाककला, राजकारण, वर्तमान घडामोडी, खेळ, आरोग्य अशा विविध विषयांवरील व्हिडीओ बनवू शकता. तसचं विविध ठिकाणांची तसचं बाजारातील नव्या प्रोडक्टसचे रिव्ह्यू देऊ शकता. कोणत्याही व्यवसायात संयम महत्वाचा आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर मिळवण्यासाठी संयम राखावा लागेल. चांगले सबस्क्रायबर असलेल्या युट्यूबर्स सोबत अनेक कंपन्या किंवा ब्रण्ड त्यांच्या जाहिरातीलसाठी हातमिळवणी करतात. ज्यातून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.

Online training/Classes- इंटरनेटमुळे सध्या जग जोडलं गेलंय आणि व्यवसायाच्या संधी वाढल्या आहेत. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. तुम्हाला शिकवणं शक्य असेल तर तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. अलिकडे सायन्स, भाषा, गणित अशा विविध विषयांसाठी ऑनलाईन क्लासेस शोधले जातात. शिवाय तुम्ही Udemy किंवा Coursera यांसारख्या साईटस्वर अप्लाय करू शकता. जिथून घरबल्या तुम्ही शिकवणी घेऊ शकता. योगा क्लास, विविध भाषा शिकवणे यासाठी सध्या चांगला वाव आहे.

रिसेलिंग बिजसेन- पूर्वी केवळ जुन्या गाड्या किंना मशीन विकल्या जात. आता मात्र आता हा व्यवसाय व्यापक होत चालला आहे. इंटरनेटवर अलिकडे अगदी जुन्या चप्पलांपासून कपडे, भांडी, फरर्निचर सगळं काही विकलं जातं. त्यामळे रिसेलिंग एजंट हा एक चांगला व्यवसाय आहे.

ब्रोकर (Real estate Broking)- अलिकडे जागा, जमिन, घर, दुकानं यांच्या खरेदी विक्रीसाठी आपण थेट त्या मालकाशी संपर्क न करता ब्रोकर म्हणजेच दलालांची मदत घेतो. यामुळे आपल्याला विविध पर्याय समजू शकतात. या व्यवसायात मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारातून ब्रोकरला काही टक्के ठरलेलं कमिशन मिळत. यासाठी तुम्हाला मार्केट किंवा ठराविक ठिकाणच्या परिसरातील उपलब्ध मालमत्ताची माहिती असणं किंवा ती घेणं महत्वाचं आहे. तसचं कॉन्टॅक्ट बनवणं म्हणजेच ओळखी वाढवणं आणि चांगला संवाद तुम्हाला करता आला पाहिजे. या व्यवसायत कोणतीही गुंतवणूक न करता चांगला वेळ देऊन व्यवसाय करणं शक्य आहे.

हे देखिल वाचा-

झिरो इन्व्हेस्टमेंट बिझिनेस
गेल्या २ महिन्यात बिझनेस यशस्वी झालाय कि डब्यात गेलाय? Prajakta Mali चा 'प्राजक्तराज' विषयी खुलासा

एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)- कोणतीही गुंतवणूक न करता पैसे कमवण्ययाचा हा एक चांगला स्त्रोस आहे. यात तुम्हाला कंपनीच्या प्रॉडक्टची ऑनलाईन मार्केटिंग करायची असते. Amazon आणि Flipcart सारख्या कंपन्यामध्ये तुम्ही एरिलिएट मार्केटिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. यात तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्टची लिंक तुमच्या मित्रांसोबत किंवा फेसबुक आणि इंन्स्ट्राग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता. तसचं जर तुम्ही ब्लॉगिंद पोस्ट किंवा यूट्यूब व्हिडिओ बनवून ही प्रोडक्टची लिंक शेअर करू शकता. तुम्ही जोडलेल्या लिंकवर क्लिक करून जो कुणी प्रोडक्ट खरेदी करेल त्यामार्फत तुम्हाला कमिशन मिळेल. अलिकडे आपण अनेक यूट्यूबर अशा लिंक शेअर करत असल्याचं पाहतो.

या व्यवसायांव्यतिरिक्त तुम्ही ट्रान्सलेटर म्हणूनही ऑनलाईन काम करू शकता. तुम्हाला विविध भाषा येत असतील तर इंटरनेटवर तुम्हाला भाषांतराचं काम मिळू शकतं. याशिवाय ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, फ्रीलान्स रायटिंग असे काही पार्ट टाइम कामंही करू शकता.

ऑफलाईन बिझनेस- यात प्रकारातही गुंतवणूक न करता किंवा अगदी कमी गुंतवणूक करून तुम्ही व्यवसाय उभारू शकता.

शिकवणी- या तुम्ही घरी काही मुलांची शिकवणी घेऊ शकता. केवळ शालेय मुलांची शिकवणी नव्हे तर तुम्हाला एखादी कला अवगत असेल तर त्याचे क्लासही तुम्ही घरी घेऊ शकता. यात केक किंवा बेकरी आयटम शिकवणे, शिवणकाम, पेंटिंग, कलाकुसरीच्या वस्तू बनवणे अशा विविध विषयांवरील क्लास तुम्ही घेऊ शकता. शिवाय एकाहून अधिक म्हणजेच दोन-तीन जणांनी एकत्रित, कुटुंबियांसोबत अथवा मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या विषयांसाठी क्लास सुरू करून व्यवसाय उभारू शकता.

होममेड प्रॉडक्स- काही अगदी कमी गुंतवणूक असलेल्या घरगुती वस्तूंची निर्मीती करून तुम्ही व्यवसाय उभारू शकता. अलिकडे अनेक कंपन्या या कच्चा माल पुरवून तयार माल विकत घेतात. अगरबत्तीस, शोभेच्या मेणबत्त्या, कपड्यांवर नक्षीकाम करणं, नॅचरल शॅम्पू, मसाले बनवणं असे व्यवसाय तुम्ही करू शकता. या वस्तूंच्या विक्रीसाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेतल्यास चांगला नफा होवू शकतो.

खानावळ- जेवणाचे डबे पुरवणे किंवा मेस हा देखील कमी गुंतवणूकीपासून सुरू होणारा व्यवसाय आहे. यात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जेवणाच्या ऑर्डर स्विकारू शकता. काही रक्कम एडव्हान्स घेऊन ऑर्डर घेतल्यास तुम्हाला गुंतवणूकीचा प्रश्न उद्भवणार नाही. याशिवाय या जेवणासोबत केक, बिस्किटं, दिवाळीचा फराळ असे पर्याय तुम्ही निवडू शकता.

ऑफलाईन व्यवसायांमध्ये तुम्ही याशिवाय शिवणकाम, पॅकिंग, बेबी सिटिंग म्हणजेच पाळणाघर चालवणं असेही काही बिझनेस सुरू करू शकता.

लक्षात घ्या कोणताही बिझनेस हा सुरूवातीला लहानच असतो. तुमच्या मेहनतीने आणि कौशल्याने तुम्ही तो मोठा करू शकता. चांगलं काम, कौशल्य, चिकाटी आणि मेहनत असेल तर यश हे नक्की मिळतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com