गेल्या २ महिन्यात बिझनेस यशस्वी झालाय कि डब्यात गेलाय? Prajakta Mali चा 'प्राजक्तराज' विषयी खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 prajakta mali, prajakta mali news

गेल्या २ महिन्यात बिझनेस यशस्वी झालाय कि डब्यात गेलाय? Prajakta Mali चा 'प्राजक्तराज' विषयी खुलासा

Prajakta Mali News: प्राजक्ता माळी अभिनेत्री, निवेदिका आहेच शिवाय ती आता यशस्वी बिझनेस वूमन सुद्धा झाली आहे. प्राजक्ताने 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून दागिने आणि ज्वेलरी व्यवसायात पदार्पण केलं.

प्राजक्ताच्या व्यवसायाबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल आहे. प्राजक्ता सुद्धा तिच्या व्यवसायाबद्दल सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट देत असते. नुकतंच प्राजक्ताने तिच्या व्यवसायाबद्दल खास पोस्ट शेयर केलीय.

(prajakta mali open up about her business prajaktaraj)

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत प्राजक्ता तिच्या प्राजक्तराज कलेक्शन मधले दागिने परिधान करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेयर करून प्राजक्ता लिहिते. “प्राजक्तराज” पर्वाला सुरू होऊन आज २ महिने झाले.

आपली संस्कृती जपली जातेय, व्यवसाय क्षेत्रात पदार्पण झालय, तुमच्या प्रेमाची पावतीही मिळतीए…; त्यामुळे सुख-समाधान मिळतय. खूप धन्यवाद.. असेच पाठीशी रहा… #कृतज्ञ"

काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ताने अभिनयासोबतच एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. प्राजक्ता माळीनं स्वतःचा ज्वेलरी ब्रॅन्ड लॉन्च केला आहे.

ज्याचं उद्धाटनं मनसे प्रमुख श्री. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलं. प्राजक्ताच्या या ब्रॅन्डचं नाव 'प्राजक्तराज' असे आहे. ६ जानेवारी,२०२३ रोजी प्राजक्तानं मुंबईतील सोहळ्यात या ब्रॅन्डचं उद्घाटनं केलं.

या ब्रॅन्डच्या माध्यमातून आता प्राजक्ता वेगवेगळ्या पारंपरिक दागिन्यांचा साज घेऊन लोकांच्या भेटीस येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्ता आपल्या या ब्रॅन्डच्या लॉन्चिंग सोहळ्याचं प्रमोशन करताना दिसली खरं,पण तिनं उद्योगविश्वातील आपल्या या नव्या भरारीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं.

त्यामुळे ब्रँड लॉन्चिंग झाल्यानंतर प्राजक्ताचं महिला उद्योग विश्वातील पाऊल तिच्या चाहत्यांना आनंद देणारं ठरलं.

सिनेमा,मालिका,वेबसिरीज यामध्ये वेगवेगळी पात्र रंगवून प्रेक्षकांना मोहात टाकणारी प्राजक्ता वाह दादा वाह म्हणत महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना देखील तितकीच प्रेक्षकांना आवडते.

अभिनयासोबतच आपली नृत्याची आवडही तिनं जोपासली आहे. तसंच, ती एक उत्तम कवयित्री देखील आहे. तिचं 'प्राजक्त प्रभा' हे कवितांचे पुस्तकही प्रकाशित झालं आहे.

टॅग्स :prajakta mali