आज शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती. मात्र, शेअर बाजार बंद होताना दोन्हीत घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे. एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील विक्री आणि अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम बाजारावर दिसून आला आहे.
परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्याने आणि जागतिक बाजारात संभ्रमाचं वातावरण असल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह कमी होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.