
Stock Market Closing Today : जागतिक पातळीवर अस्थिरता वाढल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ४५० अंकांनी कोसळून ८१,९५४.४८ वर बंद झाला, तर निफ्टी २५,००० च्या महत्त्वाच्या पातळीखाली २४,९८६.३० वर पोहोचला. युद्धजन्य परिस्थिती आणि त्यात अमेरिकेचा हस्तक्षेप यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सेन्सेक्सने ७०४ अंकांची मोठी घसरण घेत ८१,७०४ वर दिवसाची सुरुवात केली, तर निफ्टीने १७३ अंकांची कमजोरी दाखवत २४,९३९ वर व्यवहार सुरू केला. बँक निफ्टी देखील ४२० अंकांनी घसरून ५५,८३२ वर उघडला.
व्यवसायाच्या शेवटी आयटी आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक विक्री पाहायला मिळाली. हे दोन्ही क्षेत्रीय निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले. टेलिकॉम, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रांनाही विक्रीचा फटका बसला. विशेष म्हणजे, आज कोणतेही क्षेत्र हिरव्या रंगात बंद झालेले नाही.
वाढलेले समभाग: १६२२
घसरण झालेले समभाग: १९५०
स्थिर समभाग: १५१
आजच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवरही काही निवडक समभागांनी चांगली कामगिरी केली. BEL, भारती एअरटेल आणि ट्रेंट हे आजचे टॉप गेनर्स ठरले.
आशियाई पेंट, शाश्वत, एचसीएलटेक, हिंदुनिल्वर आणि इन्फे.
आज रुपया डॉलरच्या तुलनेत ८६.५९ वरून घसरून ८६.७६/$ वर उघडला. दरम्यान, क्रूड आणि सोन्याच्या दरात फारशी चढउतार दिसून आली नाही. हे सध्याच्या अनिश्चिततेत स्थैर्याचं लक्षण मानलं जात आहे.
आजचा दिवस बाजारासाठी नक्कीच आव्हानात्मक ठरला. मात्र विश्लेषकांचे म्हणणे आहे की, निफ्टीने २५,००० वर टिकून राहणे आणि बँक निफ्टीने ५६,०००च्या जवळ बंद होणे हीच सध्या बाजारासाठी सकारात्मक बाब आहे. पुढील काही दिवसांत युद्धजन्य परिस्थिती, परकीय गुंतवणूकदारांची हालचाल आणि जागतिक संकेत या घटकांवर बाजाराचे भविष्य अवलंबून असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.