

Success Story: He Quit a ₹1.5 Lakh Job and Now Earns ₹36 Lakh Profit From Desi Poultry Farming!
eSakal
Business Story: एकेकाळी महिन्याला तब्बल 1.5 लाख पगार घेणारे अरविंद कुमार श्रीवास्तव आज स्वतःचा व्यवसाय उभा करून लाखोंची कमाई करत आहेत. MBA केल्यानंतर त्यांनी बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये काम केले. करिअरमध्ये प्रगती करताना त्यांचा वार्षिक पगार पॅकेज सुमारे 18 लाखांपर्यंत पोहोचला होता म्हणजेच महिन्याला 1.5 लाख रुपये.
मात्र, नोकरीच्या सुरक्षित चौकटीत राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. अखेर त्यांनी चांगली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी व्यवसायाच्या अनेक संधी तपासल्या आणि आज ते ग्रेटर नोएडामध्ये देशी अंडी आणि कोंबड्यांच्या व्यवसायातून वर्षाला करोडो रुपयांची कमाई करत आहेत.