
Maharashtra Sugar Production Drops: देशातील आघाडीचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चालू हंगामात आतापर्यंत राज्यात 76 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या हंगामाच्या तुलनेत ते सुमारे 20 टक्के कमी आहे. उसाच्या टंचाईमुळे राज्यातील 92 कारखान्यांचे कामकाज ठप्प पडले आहे. तर गेल्या हंगामात आतापर्यंत केवळ 36 साखर कारखानदारांनी काम बंद केले होते.