स्मार्ट माहिती : म्युच्युअल फंडावरील भांडवली नफा व कर

सध्या बहुतेकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचे वेध लागले आहेत. आता ३१ जुलै ही विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आल्याने सर्वांची धावपळ सुरू झाली.
Tax
TaxSakal

सध्या बहुतेकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचे वेध लागले आहेत. आता ३१ जुलै ही विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आल्याने सर्वांची धावपळ सुरू झाली आहे. पूर्वी नोकरदार मंडळींना फक्त ‘फॉर्म नंबर १६’ ‘सीए’कडे दिला, की निश्‍चिंती असायची. परंतु, भांडवली फायद्याकडे बहुतेक जणांचे दुर्लक्ष असायचे. आता पॅन नंबरवरून प्रत्येक व्यवहाराची नोंद होत असल्याने भांडवली लाभावरील योग्य कर भरणे महत्त्वाचे ठरते.

तुम्ही शेअर, म्युच्युअल फंड, घर आदी विकले असेल आणि त्यावर भांडवली लाभ झाला असेल, तर कर भरावा लागतो. अशावेळी सीए तुमच्याकडे याची चौकशी करतात. बहुतेकजण म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवतात आणि वेळोवेळी फायदा काढून घेतात किंवा तसे केले नाही आणि गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली असेल, तरीही आज ‘एसटीपी’ अर्थात ‘सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’ खूप प्रचलित आहे.

यामध्ये प्रथम लिक्विड योजनेमध्ये पैसे गुंतवून ते रोज किंवा आठवड्याला किंवा महिन्याला आपोआप इक्विटी योजनेमध्ये हस्तांतरित केले जातात. अशावेळी, लिक्विड योजनेमध्ये तुम्हाला हमखास भांडवली लाभ होतो आणि त्यावर कर द्यावा लागतो.

बहुतेक गुंतवणूकदारांना प्रश्न पडतो, की हा भांडवली लाभ कसा मोजावा आणि कळवावा. याचे साधे आणि सोपे उत्तर म्हणजे, भांडवली लाभाचे असे स्टेटमेंट काही संकेतस्थळावरून दोन मिनिटांत तयार मिळू शकते. त्यासाठी कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

स्टेटमेंट मिळवण्यासाठी

१. ‘कॅम्स’ म्हणजेच कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस, जे बहुतेक म्युच्युअल फंड कंपन्यांचे रजिस्ट्रार आहेत. कॅम्सच्या https://www.camsonline.com या संकेतस्थळाला भेट देऊन स्टेटमेंट ऑफ फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन्सचा पर्याय निवडून तिथे आवश्‍यक माहिती भरली, की तुम्हाला तुमच्या ई-मेलवर हे स्टेटमेंट मिळते.

२. ‘के-फिनटेक’ हे सुद्धा काही ठराविक म्युच्युअल फंड कंपन्यांचे रजिस्ट्रार आहेत. त्यांच्या https://www.kfintech.com या संकेतस्थळावरूनसुद्धा तुम्ही हे स्टेटमेंट मिळवू शकता.

३. विविध म्युच्युअल फंड कंपन्यांच्या संकेतस्थळावरूनही ही माहिती मिळवता येते. त्यासाठी संकेतस्थळावर ‘लॉग-इन’ करून आवश्‍यक माहिती भरून त्या विशिष्ट फंडाचे स्टेटमेंट मिळवता येते.

यावरून तुम्हाला तुमचा ठराविक वर्षाचा भांडवली लाभ किती आहे ते कळते. त्यावरील कर किती आहे, हे तुम्हाला किंवा तुमच्या सीएला काढावे लागेल. विविध म्युच्युअल फंड योजनांसाठी किती कर असतो, त्याची माहिती सोबतच्या तक्त्यात दिली आहे.परंतु, तुमची गुंतवणूक रेग्युलर पर्याय अर्थात एखाद्या मध्यस्थामार्फत केली असेल, तर बहुतेक मध्यस्थ तुम्हाला तुमच्या सर्व म्युच्युअल फंड योजनांवरील भांडवली कर एकाच स्टेटमेंटमध्ये देऊ शकतील. त्यामुळे प्रत्येक फंडाचे वेगळे स्टेटमेंट काढण्याचा त्रास वाचेल.

(लेखक ‘ए३एस’ फायनान्शिअल सोल्युशन्सचे प्रवर्तक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com