गुंतवणुकीवरील करआकारणी

सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिना आला, की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे वर्षभरात केलेली वैयक्तिक गुंतवणूक तपासण्याचे.
Income Tax
Income Taxsakal

सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिना आला, की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे वर्षभरात केलेली वैयक्तिक गुंतवणूक तपासण्याचे. करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकरातून वजावटीसाठी केलेली किमान गुंतवणूक (जुन्या प्रणालीनुसार) कमी नाही ना? हे तपासणे आवश्यक आहे.

आर्थिक नियोजनासाठी किंवा प्राप्तिकर वजावटीसाठी गुंतवणूक कमी झालेली निदर्शनास आली, तर त्याची पूर्तता ३१ मार्च २०२४ च्या आधी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणते पर्याय उपयुक्त आहेत, याची माहिती घेऊ या.

आर्थिक नियोजनाचा मूलभूत पाया म्हणजेच गुंतवणूक. एखाद्या व्यक्तीला उत्पन्न मिळायला लागले, की पुढील उज्ज्‍वल भविष्यासाठी बचत आवश्यक असतेच, मात्र भविष्यासाठी भरभक्कम आर्थिक तरतूद करायची असेल, तर योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महागाईवर मात करणे, वृद्धापकाळासाठी तरतूद, मुलांचे संगोपन आदीसाठी गुंतवणूक अनिवार्य असते.

गुंतवणूक करताना समतोल साधणे खूप आवश्यक असते, एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतविण्यापेक्षा विविध ठिकाणी पैसे गुंतवा, यामुळे तुम्हाला उत्तम परतावा, सुरक्षितता मिळते. गुंतवणूक करताना विविध पर्यायांपैकी आवश्‍यक आणि महत्त्वाचे पर्याय ठरविणे गरजेचे असते. पर्यायानुसार करबचतीचे प्रमाण वेगवेगळे असते.

गुंतवणूक पर्याय व कररचना

शेअरमधील गुंतवणूक

कोविड महासाथीनंतरच्या काळात शेअरमधील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. शेअर हे गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे; मात्र त्यामध्ये जोखीम आहे. शेअरमधील गुंतवणुकीसाठी चांगला अभ्यास आणि दीर्घकालीन गुंतवणूक महत्त्वाची आहे.

अ) कलम ११२ ए-२ नुसार दीर्घकालीन भांडवली नफा (शेअर ठेवण्याचा कालावधी १२ महिन्यांच्या पुढे) झाल्यास, करआकारणीचा दर १० टक्के आहे. (एक लाख रुपयांच्या पुढे). अर्थात, यामध्ये इंडेक्सेशनच्या तरतुदी बघणेही आवश्यक आहे.

ब) कलम १११ ए नुसार अल्पकालीन भांडवली नफा झाल्यास (शेअर ठेवण्याचा कालावधी १२ महिन्यांपेक्षा कमी) करआकारणीचा दर १५ टक्के आहे.

म्युच्युअल फंड

अतिशय कमी वेळात लोकप्रिय झालेली गुंतवणूक म्हणजेच म्युच्युअल फंड एसआयपी. म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत शेअरसारखी जोखीम नसते, कंपाउंडिंगचा फायदा मिळतो आणि परतावाही चांगला मिळतो. महागाईवर मात करण्याची क्षमता शेअर व म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत आहे. फंडांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली, तरच उत्तम परतावा मिळतो.

इक्विटी म्युच्युअल फंडावरील गुंतवणुकीवरील प्राप्तिकर आकारणीदेखील शेअरमधील गुंतवणूकदराप्रमाणेच असते. दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी (१लाख रुपयांच्या पुढे) १० टक्के, तर अल्पकालीन भांडवली नफ्यावर १५ टक्क्यांप्रमाणे. इंडेक्सेशनच्या तरतुदी बघणे येथेही आवश्यक असते. डेट म्युच्युअल फंडावर प्राप्तिकर स्लॅब रेट लागू होतो.

सोने व रोखे

सोन्यातील गुंतवणूक ही पारंपरिक आणि सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून ओळखला जातो. महिलावर्गाचा कल याकडे अधिक असतो. सोन्यातील गुंतवणूक आजही भूरळ घालते. अलीकडच्या काळात सार्वभौम सुवर्ण रोखे किंवा ‘ईटीएफ’मध्येही गुंतवणूक केली जाते. सोन्यातील गुंतवणुकीवर दीर्घकालीन भांडवली नफा झाल्यास २० टक्के दराने करआकारणी केली जाते.

स्थावर मालमत्ता

स्थावर मालमत्तेतील (प्रॉपर्टी) गुंतवणुकीला आजही लोकांची मोठी पसंती मिळते. सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. एखादे घर किंवा फ्लॅटविक्रीतून दीर्घकालीन भांडवली नफा झाला, तर त्यावर २० टक्के प्राप्तिकर लागू होतो. मात्र, या विक्रीच्या आधी किंवा विक्रीनंतर ठरविक कालावधीत फ्लॅट खरेदी केल्यास किंवा रोखे घेतले, तर त्याची वजावट प्राप्तिकरदात्यास मिळते; त्याचबरोबर विकलेल्या फ्लॅटचे इंडेक्सेशन करून बाजारभावाप्रमाणे भाव काढून, त्याची वजावटही करदात्यास मिळते.

प्राप्तिकर वजावटीसाठी जुन्या करप्रणालीनुसार कलम ८० सी अंतर्गत आयुर्विमा, सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना आदीसह, ८० डी अंतर्गत मेडिक्लेम व इतर सर्व वजावटींचाही लाभ घेता येतो. त्याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com