
टीसीएसने 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील 2% कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
वार्षिक वेतनवाढ आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती थांबवली आहे, तर बेंचवर असलेल्या कर्मचाऱ्यांना 35 दिवसांत प्रोजेक्ट मिळाला नाही तर नोकरी सोडावी लागणार.
AI, ऑटोमेशन आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे आयटी क्षेत्रात मोठे संरचनात्मक बदल होत आहेत, आणखी कपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
TCS Recruitment: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीच्या तयारीत आहे. कंपनी 6 लाख कर्मचाऱ्यांमधून सुमारे 2 टक्के म्हणजेच 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. यासोबतच अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे आणि वार्षिक वेतनवाढ थांबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.