
Brand Finance 2025: भारतातील विविध ब्रँड्सनी जागतिक स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. ज्यामध्ये टाटा समूह पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. ब्रँड फायनान्सच्या 2025च्या ग्लोबल 500 अहवालानुसार, कंपनीची ब्रँड व्हॅल्यू 10 टक्क्यांनी वाढून 31.6 अब्ज डॉलर झाली आहे. त्यानंतर टाटा समूह 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय ब्रँड बनला आहे.