
Tata Sons boss' Message To Group CEOs: देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, टाटा सन्सचे बॉस म्हणजेच अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांच्या सीईओंना सतर्क केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कंपन्यांच्या सीईओंना कंपन्यांची कमाई वाढवण्यास सांगितले आहे. त्यांनी कंपन्यांच्या सीईओंना बाजारातील संधींचा फायदा घेऊन पुढे जाण्याचा आग्रह धरला आहे.