Tata Group: टाटांची 'ही' कंपनी होणार बंद! NCLT ने विलीनीकरणाच्या प्रस्तावाला दिली मंजूरी

Tata Group: टीसीएलने शेअर बाजाराला ही माहिती दिली.
TCL gets NCLT Kolkata nod for merger with Tata Consumer Products
TCL gets NCLT Kolkata nod for merger with Tata Consumer Products Sakal

Tata Group: टाटा समूहाची कंपनी टाटा कॉफी लिमिटेड (TCL) च्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) च्या कोलकाता खंडपीठाने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि TCPL ब्रेवरीज आणि फूड यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे.

टीसीएलने शेअर बाजाराला सांगितले की कोलकाता खंडपीठाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी विलीनीकरण योजनेला मंजुरी देणारा आदेश पारित केला. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांना 1 डिसेंबर 2023 रोजी ऑर्डरची प्रत मिळाली.

टाटा कॉफी सध्या खाद्य आणि पेय पोर्टफोलिओसह जगभरात ग्राहक उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. TCL आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या मोठ्या प्रमाणात इन्स्टंट कॉफी, ब्रँडेड कॉफी व्यवसायात काम करतात.

TCL gets NCLT Kolkata nod for merger with Tata Consumer Products
अदानींचा मेगा प्लॅन! पुढच्या 10 वर्षांत पायाभूत सुविधांमध्ये करणार 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

दरम्यान, टाटा कॉफीला व्हिएतनाममधील तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीची क्षमता वाढवण्यासाठी संचालक मंडळाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी 450 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

संचालक मंडळाने व्हिएतनाममध्ये अतिरिक्त 5,500 टन 'फ्रीझ-ड्राय कॉफी' सुविधा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. टाटा कॉफीच्या व्हिएतनाम कंपनीची सध्याची क्षमता सुमारे 5,000 टन आहे. एकूण क्षमतेपैकी 96 टक्के क्षमतेचा वापर सुरू आहे.

TCL gets NCLT Kolkata nod for merger with Tata Consumer Products
New Sebi Rules: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, आता 1 एप्रिल 2024 पासून सेबीचे नवे नियम होणार लागू

टाटा कॉफीचे शेअर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी ते 279.75 वर बंद झाले. एका दिवसाच्या आधीच्या तुलनेत स्टॉकमध्ये 0.68% वाढ नोंदवली गेली. व्यवहारादरम्यान शेअरची किंमत 283 रुपयांपर्यंत पोहोचली. 52 आठवड्यांतील ही शेअरची सर्वोच्च पातळी होती. कंपनीचे मार्केट कॅप 5,224.90 कोटी रुपये आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com