
भारतातल्या सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असेलल्या टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कंपनी २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ जाहीर करणार आहे. मात्र यंदा अपेक्षित वाढ ही गत चार वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी असण्याची शक्यता असणार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं असून यावर्षीची पगारवाढ सरासरी ४ ते ८ टक्के इतकीच असणार आहे.