TCS Recruitment: टीसीएसमध्ये मोठी नोकर भरती; अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून हजारो फ्रेशर्सना संधी

TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, TCS ने 10,000 पेक्षा जास्त फ्रेशर्सना कामावर घेतले आहे.
TCS hires more than 10,000 freshers from top engineering colleges Report
TCS hires more than 10,000 freshers from top engineering colleges Report Sakal

TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, TCS ने 10,000 पेक्षा जास्त फ्रेशर्सना कामावर घेतले आहे. या आर्थिक वर्षात मागणीत सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने आयटी कंपनीने नोकरीत वाढ केली आहे.

TCS ने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की त्यांनी नॅशनल क्वालिफायर टेस्ट (NQT) द्वारे नवीन भरती सुरू केली आहे, ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल होती.

अनेक उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून 10 हजार फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या आहेत. ही नियुक्ती निन्जा, डिजिटल आणि प्राइमसाठी आहे. निन्जा श्रेणीमध्ये 3.36 लाख रुपये, डिजिटलमध्ये 7 लाख रुपये आणि प्राइमसाठी 9-11.5 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते.

TCS hires more than 10,000 freshers from top engineering colleges Report
Gold Investment: सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर; गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

प्लेसमेंट अधिकाऱ्यांच्या मते ज्यांना जास्त प्रशिक्षणाची गरज नाही अशा विद्यार्थ्यांच्या शोधात कंपनी असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक व्ही सॅम्युअल राजकुमार म्हणाले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे एक चांगले पाऊल आहे.

सर्व चांगल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये प्लेसमेंट मिळेल. आमच्यातील 963 विद्यार्थ्यांना ऑफर लेटर प्राप्त झाली असून त्यापैकी 103 प्राइम श्रेणीतील आहेत.

SASTRA युनिव्हर्सिटीचे कुलगुरू एस वैद्यसुब्रमण्यम म्हणतात की आमच्या कॉलेजच्या 1,300 विद्यार्थ्यांना 2,000 हून अधिक ऑफर लेटर मिळाली आहेत. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी एकापेक्षा जास्त ऑफर मिळाल्या आहेत.

TCS hires more than 10,000 freshers from top engineering colleges Report
Truong My Lan: जगातील सर्वात मोठी फसवणूक! अब्जाधीश महिलेला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा; काय आहे प्रकरण?

टीसीएसचे सीईओ आणि एमडी क्रितिवासन यांनी सांगितले की टीसीएसने यापूर्वी असेही म्हटले होते की 2024 या आर्थिक वर्षात 40,000 फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याची योजना आहे. अर्थात यावेळी प्लेसमेंटला उशीर झाला असला तरी त्यांना चांगले उमेदवार मिळतील अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com