
TCS layoffs 2025
Sakal
TCS layoffs 2025: भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी आणि जगभरात नावाजलेली कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) नव्या तिमाही निकालांमधून धक्कादायक आकडा समोर आला आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यांत आपल्या वर्कफोर्समधून तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. म्हणजेच साधारणपणे दर तासाला नऊ जण कंपनीतून बाहेर गेले आहेत.