टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनी 70 टक्के कर्मचार्‍यांना देणार 100 टक्के 'व्हेरिएबल पे'

TCS Variable Pay: भारताची दिग्गज टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) 70 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के व्हेरिएबल पे देण्याच्या तयारीत आहे. याचा लाभ कनिष्ठ ते मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. अशी माहिती सीएचआरओ मिलिंद लक्कड यांनी दिली आहे.
TCS to give out 100 percent variable pay to 70 percent of the employees for Q3
TCS to give out 100 percent variable pay to 70 percent of the employees for Q3 Sakal

TCS Variable Pay : भारताची दिग्गज टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) 70 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के व्हेरिएबल पे देण्याच्या तयारीत आहे. याचा लाभ कनिष्ठ ते मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. अशी माहिती सीएचआरओ मिलिंद लक्कड यांनी दिली आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून दर महिन्याला निश्चित पगार मिळतो. TCS ने यात बदल केला आहे. कंपनीने आपल्या 70 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के बदली पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामानुसार वेतन मिळेल.

गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर देशातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. टाटा समूहाची सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) चे निकाल जाहीर झाले. तर या क्षेत्रातील दुसरी कंपनी इन्फोसिसच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत घट झाली आहे.

TCS to give out 100 percent variable pay to 70 percent of the employees for Q3
Polycab Share: पॉलीकॅबचे शेअर्स 22 टक्क्यांनी घसरले; आयकर विभागाने कंपनीवर केले गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

TCS ने डिसेंबर-2023 साठी म्हणजेच तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत या IT कंपनीच्या निव्वळ नफ्यात 8.2% वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की, तिचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 8.2% ने वाढला आहे आणि तो 11,735 कोटी रुपये झाला आहे. तसेच कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 4% वाढून 60,583 कोटी रुपये झाला आहे.

TCS to give out 100 percent variable pay to 70 percent of the employees for Q3
India-Maldives Row: 'राष्ट्र प्रथम व्यवसाय नंतर', भारत मालदीव वादात 'या' कंपनीची जाहिरात चर्चेत

निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने प्रति शेअर 27 रुपये लाभांशही जाहीर केला आहे. कंपनीकडे सध्या 8.1 बिलियन डॉलर किंमतीच्या ऑर्डर आहेत. गुरुवारी TCS चे शेअर्स किंचित वाढीसह 3,726.70 रुपयांवर बंद झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com