
65 लाख पगाराची नोकरी सोडून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला.
ब्रेकनंतर तो पुन्हा त्याच कंपनीत रुजू झाला आणि त्याला 15% पगारवाढ मिळाली.
नेटिझन्सनी त्याच्या निर्णयाचं कौतुक करताना म्हटलं की हा धाडसी निर्णय होता.
65 LPA Salary Break Story: सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एका तरुणाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वार्षिक 65 लाख पगाराची नोकरी सोडून हा तरुण सहा महिन्यांसाठी प्रवासाला गेला. सहा महिने फिरून आणि आराम करून आल्यानंतर त्याने पुन्हा त्याच कंपनीत रुजू होण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे, परतल्यावर त्याला पगारवाढीसह तीच नोकरी मिळाली.