Raghuvir Exim IPO : 'ही' टेक्सटाइल कंपनी आणणार आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

टेक्सटाइल कंपनी रघुवीर एक्झिम लिमिटेड (Raghuvir Exim) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे.
Raghuvir Exim IPO
Raghuvir Exim IPOSakal

टेक्सटाइल कंपनी रघुवीर एक्झिम लिमिटेड (Raghuvir Exim) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. आयपीओमधून जमा होणारा फंड कंपनीच्या विस्तार योजनांसाठी वापरण्यात येईल, असे कंपनीने कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

या वर्षी आतापर्यंत 30 हून अधिक कंपन्यांनी सेबीकडे ड्राफ्ट आयपीओ कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट पेपर्सनुसार, कंपनीच्या आयपीओअंतर्गत 1.4 कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, प्रमोटर सुनील अग्रवाल यांच्याद्वारे 45 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील.

सध्या कंपनीमध्ये 100 टक्के हिस्सा प्रमोटर्सकडे आहे. गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या मसुद्यानुसार, फ्रेश इश्यूतून मिळालेले 113 कोटी अहमदाबादमध्ये दोन स्टिचिंग युनिट्स उभारण्यासाठी वापरले जातील. त्याच वेळी, निधीचा एक भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील वापरला जाईल.

अहमदाबाद स्थित कंपनी रघुवीर एक्झिम लिमिटेड सेमी-फिनिश्ड फॅब्रिक्सवर प्रक्रिया करून तयार कपडे बनवण्याच्या प्रोसेसमध्ये गुंतलेली आहे. ही कंपनी होम फर्निशिंग प्रोडक्ट्स बनवते. युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर आयपीओनंतर लिस्ट केले जातील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com