
जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीत 33 औषधांवरचा 12% जीएसटी रद्द करून शून्य करण्यात आला.
या निर्णयामुळे कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
नवीन नियम 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून, आता फक्त 5% आणि 18% असे दोनच करस्लॅब राहतील.
GST Rate Cut: जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीत सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत दोन नवीन करस्लॅब, 5% आणि 18% मंजूर करण्यात आले. सर्वात मोठा दिलासा म्हणजे 33 महागड्या औषधांवर लागू असलेला 12% जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे. या औषधांमध्ये प्रामुख्याने कॅन्सर, रक्तविकार, दुर्मिळ आनुवंशिक आजार आणि गंभीर रोगांच्या उपचारासाठी लागणारी औषधे समाविष्ट आहेत.