
Income Tax Return Filing: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी पगारदार आणि पेन्शनधारकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. मात्र, इतर टॅक्सपेअर्सच्या डेडलाइनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ITR भरताना चुकीची माहिती टाळण्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हाताशी ठेवणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला योग्य फॉर्म निवडायला आणि तुमचं उत्पन्न व कराची योग्य माहिती देण्यासाठी मदत करतात.