Torrent Power : 'या' पॉवर कंपनीला मिळाला मोठा सोलर प्रोजेक्ट, येत्या काळात दमदार परताव्याचा विश्वास...

टोरेंट पॉवर (Torrent Power) या टोरेंट ग्रुपच्या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडकडून (MSEDCL) 306 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्याचे काँट्रॅक्ट मिळाले आहे.
This power company got a big solar project confident of strong returns in the coming years...
This power company got a big solar project confident of strong returns in the coming years...Sakal

टोरेंट पॉवर (Torrent Power) या टोरेंट ग्रुपच्या कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडकडून (MSEDCL) 306 मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्याचे काँट्रॅक्ट मिळाले आहे. पीएम-कुसुम योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रकल्पाची किंमत 1,540 कोटी आहे. टोरेंट पॉवर हा मल्टीबॅगर स्टॉक आहे.

या शेअरने एका वर्षात 120 टक्के मजबूत परतावा दिला आहे.एक्सचेंज फायलिंगनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोजेक्टचे ऍलॉटमेंट लेटर दिले. कंपनीला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने 7 मार्चला नाशिक जिल्ह्यात 48 वितरित ठिकाणी 306 मेगावॅट ग्रिड-कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंत्राट दिले आहे.

वितरण नेटवर्कशी जोडलेल्या पीएम-कुसुम योजनेच्या (PM KUSUM Scheme) घटक-सी अंतर्गत फीडर स्तरावरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 (MSKVY) अंतर्गत एमएसईबी सोलर ऍग्रो पॉवर लिमिटेडं (MSAPL) या प्रकल्पाची संकल्पना आहे.

प्रोजेक्टची अंदाजे किंमत 1,540 कोटी आहे. ते 18 महिन्यांत कार्यान्वित करायचे आहे. प्रकल्पासाठी 25 वर्षांच्या कालावधीसाठी 3.10 रुपये प्रति किलोवॅट दर आहे. या प्रकल्पामुळे, टॉरंटची बांधकामाधीन अक्षय ऊर्जा क्षमता 1.7 गीगावॅटपर्यंत वाढली आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर, कंपनीची एकूण नूतनीकरणक्षम क्षमता पुढील 18 ते 24 महिन्यांत 3 गीगावॅटपर्यंत (1 GW सम 1,000 MW) वाढेल.

टोरंट पॉवर या मल्टीबॅगर पॉवर स्टॉकने त्यांच्या शेअरहोल्डर्सना चांगला परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर 20 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. 6 महिन्यांत स्टॉकचा परतावा 59 टक्के आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,235.10 रुपये आहे आणि निचांक 485 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 54,965.74 कोटी आहे. सध्या हा शेअर 1143.65 रुपयांवर ट्रेड करत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com