EV Charging Station : ‘ईव्‍ही चार्जिंग’ सुविधेसाठी ‘टाटा’ आणि ‘शेल’ एकत्र; काय आहे प्लॅन?

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) कंपनीने संपूर्ण देशभरात सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन स्‍थापन करण्‍यासाठी शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि. (एसआयएमपीएल) सो‍बत एक सामंजस्‍य करार केला आहे.
EV Charging Station
EV Charging Station Sakal

मुंबई : टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) कंपनीने संपूर्ण देशभरात सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन स्‍थापन करण्‍यासाठी शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि. (एसआयएमपीएल) सो‍बत एक सामंजस्‍य करार केला आहे. या करारानुसार, शेल कंपनीच्या पेट्रोल पंपांवर ‘ईव्‍ही’ चार्जर्स उभारण्यात येणार आहेत.

यामुळे टाटा ‘ईव्ही’ ग्राहकांना दूरवरच्या प्रवासातही उत्तम चार्जिंग सुविधेचा लाभ घेता येईल. देशातील अधिकाधिक व्‍यक्‍तींना इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रेरित करण्‍याच्या उद्देशाने चार्जिंग सुविधेचा विस्तार करण्यात येत आहे.

या दोन्ही कंपन्या सोयीस्‍कर पेमेंट सिस्‍टीम व लॉयल्‍टी प्रोग्रॅम आणण्‍याचाही प्रयत्‍न करत आहेत. ‘शेल इंडिया मार्केट्स’चे संचालक संजय वर्की आणि ‘टीपीईम’चे चीफ स्‍ट्रॅटेजी ऑफिसर बाला.जे. राजन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

बाला राजन म्‍हणाले, ‘‘देशातील ‘ईव्‍ही’ परिसंस्था प्रगत करण्‍याच्या आमच्‍या प्रयत्‍नाचा भाग म्‍हणून आम्ही ‘शेल’सोबत भागीदारी केली आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमच्या चार्जिंग पायाभूत सुविधेमध्‍ये वाढ करण्‍याचा प्रयत्न आहे,

विशेषत: ग्राहकवर्गामध्‍ये वाढ होत असताना देशातील ‘ईव्‍हीं’च्‍या वापराला गती देण्‍यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. हा धोरणात्‍मक सहयोग देशातील चार्जिंग पद्धतींमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल, परिणामत: देशामध्‍ये ‘ईव्‍ही’ वापराला गती मिळेल.’’

संजय वर्की म्‍हणाले, ‘‘व्यापक आणि सोयीस्कर चार्जिंग पायाभूत सुविधा ‘ईव्ही’ स्वीकृतीला चालना देण्यासाठी आवश्‍यक आहे, हे जगभरातील संशोधनांमधून दिसून आले आहे. चार्जिंग पायाभूत सुविधांमधील वाढीमुळे ‘ईव्ही’ वापर वाढण्यास मदत होईल. हे साध्य करण्याच्या दृष्टीने दोन्ही आघाडीच्या कंपन्यांमधील हा सहयोग देशातील ‘ईव्ही’ वाढीच्या पुढील टप्प्यात महत्त्वपूर्ण ठरेल’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com