
Summary
सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला असून २४ कॅरेट सोने ९९६२३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.
चांदीचा भावही उतरून ११४०५० रुपये प्रति किलो झाला आहे.
सोने-चांदीचे दर डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क, जागतिक परिस्थिती आणि स्थानिक मागणीवर ठरतात.
सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा बदल झाले. सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याची भाव प्रति १० ग्रॅम ९९६२३ रुपये तर चांदीचा भाव प्रति किलो ११४०५० रुपये इतका आहे. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय आहेत ते जाणून घ्या.