
Gold jewellery and silver bars representing today’s record-high market rates in India
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,10,869 आणि चांदीचा भाव प्रति किलो ₹1,29,300 वर पोहोचला.
सोन्याचे दर विविध कॅरेटमध्ये बदलले असून 22 कॅरेटचे दर ₹1,01,556 प्रति 10 ग्रॅम आहेत.
किमती वाढण्यामागे फेडरल रिझर्व्हचे दर, जागतिक तणाव आणि भारतातील वाढती मागणी कारणीभूत आहेत.
Gold Price Today: सोने आणि चांदीचे भाव वाढतच आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ११०८६९ रुपये झाला, तर चांदीचा भाव प्रति किलो १२९३०० रुपये झाला. दरम्यान, ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार मंगळवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१५,१०० रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला. चांदीही प्रति किलो १,३२,८७० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली.