
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात टॅरिफला आपले प्रभावी शस्त्र बनवले आहे.सोप्या भाषेत जर समजायचं झालं,तर त्यांच्या धोरणानुसार,जे देश अमेरिकन उत्पादनांवर जास्त शुल्क लावतात, त्यांच्यावरही प्रतिउत्तर म्हणून समान कर लावला जाईल. या धोरणामुळे भारतावर 26% रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्यात आले आहे, ज्याचा थेट परिणाम भारतीय निर्यात, उद्योग आणि GDP वर होण्याची शक्यता आहे.