
Trump's New Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात करण्यात येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर 50% कर लादण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारताच्या निर्यातीवर, स्थानिक उत्पादनावर, किंमतींवर आणि व्यापारावर परिणाम होऊ शकतो. सध्या भारतीय स्टील कंपन्यांवर कोणताही मोठा थेट परिणाम झालेला नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीन आणि इतर देशांकडून डंपिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.